Missing Girls From Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Love Jihad: प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झालेल्या तरुणींसाठी सरकारचं पाऊल; दिले 'हे' निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा खून प्रकरणानंतर राज्य सरकारनेदेखील पावलं उचलली आहेत. प्रेमाच्या जाळ्यात अडकून आणि लव्ह जिहादमुळे बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिले आहेत.

Missing Girls From Maharashtra

श्रद्धा खून प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं आहे. या प्रकारानंतर लव्ह जिहादचीही चर्चा रंगत आहे. त्यातच आज राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला निर्देश दिलेले आहेत. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या बेपत्ता मुलींचा शोध या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की, दिल्लीच्या घटनेने देश हादरुन गेला आहे. ती मुलगी आपल्या महाराष्ट्राची होती. प्रेमाच्या जाळ्यात अडकून मुलींचे लग्न होतात. मात्र पुढे त्यांचं काय सुरुय ते पाहिलं जात नाही. दिल्लीतील मुलगी सहा महिने बेपत्ता होती. त्यामुळे अशा बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्याची गरज आहे. महिला आयोगाला अशा मुलींचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यासाठी पथक स्थापन करण्यास सांगितल्याची माहिती लोढांनी दिली.

परिवारापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार पावलं उचलीत आहे. लव्ह जिहादमुळे मुली बेपत्ता होत असल्याच्या चर्चा नेहमी होतात. त्याच अनुषंगाने राज्य सरकार विचार करत असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

SCROLL FOR NEXT