Lata Mangeshkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Lata Mangeshkar : राज्यात दुखवटा; उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर

देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Legendary Singer Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारनेही सोमवार म्हणजे उद्या ( ता. ७) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटलंय, आज रविवार (ता. ६) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी,अधिनियम, १८८१ (सन १९८१चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपवण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार (ता. ७) फेब्रुवारीला राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

दरम्यान, लता मंगेशकर यांचं आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT