uddhav thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी ही १२ तासांहून कमी करून ती ८ तास करण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली. या निर्णयाचे कौतुक महिला पोलिसांकडून करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरवरून राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री मा. दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.

अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, महिला पोलिसांच्या ड्युटीमध्ये ४ तासांची कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची करण्याबाबत नागपूर शहरात प्रायोगिक तत्वावर ८ तासांच्या ड्युटीचा उपक्रम सुरु केला होता. त्यानतंर पोलिस महासंचालक यांनी या निर्णय़ाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती. पुढे पुणे ग्रामीण पोलिसातील महिलांसाठीही ८ तासांची ड्युटी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT