GST Bhavan
GST Bhavan 
महाराष्ट्र

GST Department Restructure: GST विभागात कंत्राटी भरतीचा घाट! पुनर्रचनेमुळं MPSCच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागात अर्थात जीएसटी विभागाची अखेर पुनर्रचना करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यात वाढणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण यादृष्टीनं ही पुनर्रचना अतिशय महत्त्वाची होती. त्याअनुषंगानं या विभागात विविध संवर्गांमध्ये ५२२ नवी पदं निर्माण करण्यात आली आहेत. पण यातील बहुतांश पंद ही कंत्राटीपद्धतीनं भरण्याचा घाट घालण्यात आला आहे. (maharashtra GST department restructure contractual recruitment would made)

पुनर्रचनेत केवळ ७चं पदांची वाढ

सरकारी तिजोरीत सर्वाधिक महसूलाची भर टाकणारा विभाग म्हणून जीएसटी विभागाला ओळखलं जातं. या विभागाची राज्य शासनानं नुकतीच पुनर्रचना केली. बऱ्याच काळापासून ही पुनर्रचना प्रलंबित असल्यानं अखेर ती झाल्यानं त्यात काय बदल होतात याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. (Latest Maharashtra News)

पण हे बदल जेव्हा प्रत्यक्षात समोर आले तेव्हा अनेक बाबी अनाकलनीय असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या पुनर्रचनेत ५२२ पदांची वाढ केली असं दिसत असलं तरी त्याचवेळी आधीचीच ५१५ पदे कमी केली आहेत. त्यामुळं एकूण बेरीज वजाबकीचा विचार करता फक्त ७ पदांची वाढ या पुनर्रचनेत झाली आहे.

वरिष्ठ अधिकारी तुपाशी, कर्माचारी मात्र उपाशी

यातही विरोधाभास असा आहे की, ही वाढ होणारी सर्वच पदं वरिष्ठ अधिकाऱ्यांची असून कमी केलेली पदं ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आहेत. म्हणजेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयातून आपापल्या सोयीसाठी ही पुनर्रचना घडून आणल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (Marathi Tajya Batmya)

STI, Tax Assistant Recruitment

या पुनर्रचनेत विभागाचा कणा असणाऱ्या राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या पदांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळं एकीकडं स्पर्धा परीक्षेची तयारी करून विभागात रुजू होण्याच्या तरुणांच्या स्वप्नांवर सरकारनं मात्र पाणी फेरलं आहे. पण यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही पदं आता बाह्य यंत्रणेद्वारे भरणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. याचाच अर्थ वस्तू व सेवाकर विभागात आता कंत्राटीकरणाचे वारे जोरदार वाहत आहेत. (Latest Marathi News)

कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार!

या पदांमध्ये कपात करण्याच्या आणि खासगीकरणाचा घाट घातला जात असल्यानं आधीच अतिरिक्त कामाच्या ताणाचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या पुनर्रचनेमुळं ताण अधिकच वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT