Sambhajiraje Chatrapati esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhajiraje Chatrapati : सीमावाद चिघळला असतानाच संभाजीराजेंना कर्नाटक सरकारनं दिली वाय प्लस सुरक्षा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा तापला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा तापला आहे.

कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही बेळगावला महाराष्ट्रापासून तोडल्यामुळं येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून बेळगांवची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सीमावादाचा मुद्दा चिघळू लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border Dispute) मुद्दा तापला आहे. त्यातच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) हे आज (रविवार) बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाजीराजे छत्रपतींना कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) वाय प्लस सुरक्षा दिलीये.

संभाजीराजे छत्रपतींनी कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत त्यांना कर्नाटक सरकारच्या वतीनं वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीये. सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीराजे छत्रपतींना कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी कर्नाटक सरकारनं घेतलीये. दरम्यान, संभाजीराजेंना याबाबत कर्नाटक पोलिसांकडून (Karnataka Police) फोन आला होता. वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचं यावेळी संभाजीराजेंना पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT