manoj jarange patil eknath shinde  
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

रोहित कणसे

सर्व मराठा आंंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली. त्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मॉरिशसचे पंतप्रधान वाराणसीत, महादेवाची केली पुजा

मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि त्याच्या पत्नीने वाराणसीच्या मंदिराला भेट दिली आणि महादेवाची पुजा केली.

भारतीय नौदल आणि उबरमध्ये सामंजस्य करार

भारतीय नौदल आणि वाहतुक कंपनी उबर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

भारत आणि सौदी अरेबियामध्ये होणार मुक्त व्यापार करार

भारत आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये व्यापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापर करार होण्याची शक्यता आहे.

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, दर २००हून २ रुपयांवर

टोमॅटोचे दर काही दिवसांपुर्वी आकाशाला भिडले होते, तर काही काळातच टोमॅटोच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. टोमॅटो दर २ रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सातारा दंगल प्रकरणात २३ जणांना अटक, एकाचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी

सातारा : जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत झालेल्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील अल्पसंख्य समाजातील युवकाचा मृतदेह दुपारी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून ताब्यात घेतला. जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अल्पसंख्य समाजातील 8 जणांवर कराड येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जमावाने सुमारे 10 घरे, दुकाने व वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली असून याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अमेरिकेतील ११/९ च्या हल्ल्याला २२ वर्ष पुर्ण

अमेरिकरेच्या ट्वीन टॉवर या इमारतींवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या घटनेला २२ वर्ष पुर्ण झाला

पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील शाळांना सुट्टी 

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव येथे दोन गटात राडा झाल्यानंतर या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव येथे दोन गटात राडा झाल्यानंतर आता कराड जवळील ओगलेवाडी येथे करवडी फाट्यावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत. सर्व वाहनांची पोलीस तपासणी करत आहेत.

गद्दारी केल्याचं अजित पवारांनी मान्य करावं - दानवे

अहमदाबादला ते आर्थिक राजधानी बनवू पाहत आहेत. सगळे उद्योग तिथे नेले, पण आम्ही मुंबईला तोडू देणार नाही. गद्दारी केली आहे हे अजित पवारांनी मान्य करावं. बँक घोटाळा, सिंचन विभाग घोटाळ्यात त्यांनी आत्मसमर्पण केलं. पण जी कारण दिली जात आहेत ती धूळफेक आहे, अशा शब्दांत दानवेंनी अजित पवारांवरही टीका केली.

भाजप ४० टक्केच उरली

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना सवलती नाही सरकारचं धोरण याला जबाबदार आहे. सध्या भाजपविरोधी वातावरण आहे. भाजप केवळ ४० टक्केच उरली आहे, अशा शब्दांत अंबादास दानवेंनी भाजपच्या सर्वेक्षणावर टीका केली.

शोबाजीसाठी अमित शहा संभाजीनगरमध्ये - दानवे

सरकारनं मराठवाड्याच्या प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे. पण केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं. केवळ शो बाजी करण्यासाठी अमित शहा संभाजी नगरमध्ये येत आहेत. जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे.

साताऱ्यात व्हायरल पोस्टवरुन दोन गटांत राडा; दोघांचा मृत्यू

साताऱ्यातील पुसेवाळी इथं दोन गटांमध्ये काल तुफान राडा झाला. यामध्ये काही समाजकंटकांकडून वाहनं पेटवण्यात आली. या गोंधळात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

शासन सुस्त आणि मंत्री मस्त; शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

शासन सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था राज्यात झाली आहे. मंत्र्यांच लक्ष शेतकऱ्यांकडे नाही. संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या गडद छायेत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यातील १८६ बीड मधील शेतकरी आहे आणि उत्तरदायी सभा करत आहात. जीव घेण्यासाठी कृषीमंत्री पद दिले का ? शेतकऱ्यांना दुर्लक्ष करत आहेत. शासन अस्तित्वात आहे का महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे आणि स्वतःच्या तिजोरी भरण्याचं आणि सरकारची तिजोरी लुटण्याचं काम सुरु आहे.

काल ७ लोकांचा ठाण्यात लिफ्ट कोसळून जीव गेला. मजल्यावर मजले चढवत असताना कामगारांची काळजी घेतली जात नाही. मुख्यमंत्री शिंदें यांच्या जिल्ह्यात त्या बिल्डवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता पण झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना विशेष न्यायालयासमोर करण्यात आलं हजर

आज ईडीची कोठडी संपल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

G20 परिषदेवर प्रचंड पैसा खर्च झाला, पण जनतेला काय मिळालं?

G20 समिटच्या आयोजनावर प्रचंड पैसा खर्च झाला, पण त्यातून देशातील सामन्य लोकांनी काय मिळाले? असा प्रश्न आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी विचारला आहे,

साताऱ्यातील पुसेसावळी येथील घटना दुःखद, अफवेला बळी पडू नका; सुप्रिया सुळेंचं अवाहन 

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव येथील घटना दुःखद आहे. माझे जनतेला आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेला बळी पडू नका. समाजात सौहार्द आणि शांतता राखण्यासाठी आपण शासन- प्रशासन तसेच पोलीस खात्याला सहकार्य करावे, अशी पोस्ट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे

कराडमध्ये काही दुकाने आणि शाळा बंद

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता. खटाव येथे दोन गटात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहर परिसरातील काही दुकाने आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेट सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांना शांततेचं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबद प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरली

शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरली आहे. अपात्रतेच्या मुद्द्यावर 14 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता होणार सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) 40 आणि उबाटा 14 आमदारांची सुनावणी होणार आहे.

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एकाच दिवशी होणार सर्व आमदारांच्या तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेतील

वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार असून प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे, तसेच संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदाराना आपलं म्हणणं मांडायला संधी देणार

चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांच्या कोठडी; टीडीपीची राज्यव्यापी बंदची हाक

विजयवाडा, आंध्र प्रदेश : टीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांच्या कोठडीत पाठवल्यानंतर टीडीपीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपाताचा कट जवानांनी उधळला

जम्मू आणि काश्मीर येथील हंजीवेरा पट्टण येथे श्रीनगर- बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी कारवाई करत वाहतूक थांबवली. त्यांनंतर ती संशयास्पद वस्तू आईडी सुरक्षा दलांनी निकामी केली. यामुळे मोठ्या हल्ल्याचा कट जवानांनी उधळून लावला आहे.

मराठा आंदोलकांकडून आज ठाणे बंदची हाक

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची मनधरणी करण्यात सरकारला अपयश येत आहे. मराठा कार्यकर्त्यांवर जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सकल मराठा मोर्चाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेने या बंदला पाठिंबा दिला असून बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT