पुण्याच्या वाघोलीमध्ये चार-पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी रुग्णालयात घडलेल्या प्रकाराविषयी समिती नेमली आहे. रुग्णालयात तीन दिवसामध्ये २७ लोकांचा मृत्यू झाला होता.
नवाब मलिक तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजरात स्वागत स्वागत केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे पोहोचले क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिकांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांची दखलही घेतली नाही. त्यावेळी सुप्रिया सुळे लॅपटॉपवर व्यस्त होत्या. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटांचे नेते क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल होण्यास सुरवात झाली आहे.
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एका हॉटेलवर हल्ला झालाय, यात तीन लोकांचा मृत्यू झालाय तर सात लोक गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे.
तळेगाव दाभाडे या ठिकाणी पुणे-मुंबई महामार्गावर झाड कोसळले आहे. हे झाड कोसळल्याने एक कार आणि एक दुचाकी त्याखाली अडकली आहे. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले असून वाहतूक ठप्प झालीये.
नवाब मलिकांवर जो अन्याय झाला, तो दुर्दैवी आहे, असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे. यावेळी त्या क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर असताना त्यांनी वक्तव्य केलं. नवाब मलिकांवर क्रिटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना जामीन मंजूर झाल्यावर त्यांना तुरुंगातून बाहेर सोडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
AIMIMपक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आरोप केलाय की त्यांच्या दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी दगडफेक करण्यात आली.
मुंबईतील म्हाडाच्या घराची सोडत झाली आहे.
नवाब मलिक यांचा पासपोर्ट कोर्टाकडे जमा केल्यानंतर ऑर्डर घेऊन वकील आणि मुलगी आर्थर रोड कडे निघतील.
हिमाचल प्रदेशात भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आजची बैठक ही लोकसभा-विधानसभा बद्दल होती. महानगरपालिका यंदा होतील असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा केली असंही यावेळी राज ठाकरे म्हणालेत.
जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक रुग्णालयातून थेट घरी जाणार आहेत. कोर्टातून रिलीज प्राप्त होताच ते ऑर्थर रोडच्या तुरूंग अधीक्षकांकडे जाईल. हा रिलीज मेमो मिळाल्यानंतर ऑर्थर रोड तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात जातील. रुग्णालयात सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक यांना थेट घरी सोडण्यात येईल. तब्बल दिड वर्षानंतर नवाब मलिक आज तुरुंगातून बाहेर येत आहेत.
मुंबई बंगळुरू हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. साताराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चांदणी चौकच्या अलीकडे पाषाण बावधन पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत
नवाब मलिक यांच्या जामिनाची प्रक्रिया आज होईल. नवाब मलिक यांची मुलगी सना खान सेशन कोर्टात दाखल झाल्या आहेत.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी पुन्हा आज बोलले आहेत. महाविकास आघाडीत एकी आहे. तुम्ही वारंवार संभ्रम निर्माण करु नका, असे शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio) संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाणार आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराबाहेर गर्दी केली आहे. आज शरद पवार हे संपूर्ण दिवसभर बारामती येथे असणार आहेत. त्यानंतर ते उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत.
भारत आणि चीनमधील सीमावाद पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहेत. आज (सोमवारी) भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 19 वी फेरी होणार आहे.
14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती. अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे. अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरु आहे.
एनआयएने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न सांगता एनआयएने ही कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.