spg 
महाराष्ट्र बातम्या

Updates: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

Sandip Kapde

मध्य प्रदेशात ७१.१६ टक्के तर छत्तीसगडमध्ये ६८.१५ टक्के मतदान

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मतदान संपलं तेव्हा ७१.१६ टक्के एकूण मतदान नोंदवलं गेलं. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये देखील आज दुसऱ्या टप्यातील मतदान झालं यामध्ये ६८.१५ टक्के मतदान झालं.

आयपीएस अधिकारी अलोक शर्मांची SPGच्या संचालकपदी नियुक्ती

पंतप्रधानपदावरील व्यक्तीसाठी पुरवण्यात येणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप या सुरक्षा यंत्रणेच्या संचालकपती आयपीएस अधिकारी अलोक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या एसपीजीमध्ये अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत.

नक्षलींच्या स्फोटात एक ITBPचा जवान शहीद

छत्तीसगडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी नक्षलवाद्यांनी गरियाबंद भागात केलेल्या आयईडी स्फोटात ITBPचा एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांनी एका मतदानाचं साहित्य घेऊन जाणाऱ्या टीमवर हल्ला चढवला होता. बडे गोब्रा मतदान केंद्रावरुन हे अधिकारी परत निघाले होते. यावेळी त्यांना संरक्षण पुरवणारा आयटीबीपीचा जवान जोगिंदर सिंह यांचा स्फोटात मृत्यू झाला. दरम्यान, ईव्हीएमला काहीही नुकसान झालं नसून मतदान अधिकारी आणि मशिन हे गरियाबंद इथं सुखरुप पोहोचले आहेत.

छत्तीसगडमध्ये ५५.३१ टक्के मतदान तर मध्य प्रदेशात ६०.५२ टक्के

छत्तीसगडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून ३ वाजेपर्यंत ५५.३१ टक्के पार पडलं आहे. तर मध्य प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु असून दुपारी ३ वाजेपर्यंत ६०.५२ टक्के मतदान झालं आहे.

एसटीनं रचला सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम!

एसटीनं सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम रचला आहे. दिवाळीदरम्यान एसटीनं ९५ कोटी ३५ लाख रुपये कमावले आहेत. यामुळं एसटी महामंडळाची खऱ्या अर्थान दिवाळी झाली आहे. एकट्या १६ नोव्हेंबर रोजी एसटीनं ३५ कोटी १८ लाख रुपये कमावले आहेत.

CM शिंदेंकडून बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण 

बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ स्मृतीदिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या रिगल सिनेमा इथल्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत नीलम गोऱ्हे, गजानन किर्तीकर उपस्थित होते.

कोल्हापुरात हत्तीनं सोंडेद्वारे जरांगेंना हार घातला

मनोज जरांगेंची सांगलीत सभा झाल्यानतंर ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हस्तीनं सोंडेद्वारे जरांगे यांच्या गळ्यात हार घातला. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.

संभाजीराजेंची भुजबळांवर टीका

छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड इथं आज आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना टार्गेट करत घणाघाती आरोप केले. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांवर टीका केली. तसेच त्यांची हाकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत वाहनांना उडवले

पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत वाहनांना उडवले. पुण्यातील सातारा रोड वर ही घटना घडली.

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत ४ ते ५ वाहनांना उडवले. भावाला न सांगता अल्पवयीन मुलगा गाडी घेऊन गेला होता. त्याच्याकडून हा सर्व प्रकार घडला. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला चांगलाच चोप दिला आहे.

"६० टक्के ओबीसी भाजपला मतदान करतात, जर..."; छगन भुजबळांचा इशारा

६० टक्के ओबीसी भाजपला मतदान करतात जर ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला तर हा ओबीसी समाज काय करेल?, असे भुजबळ म्हणाले.

ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांच्या भाषणाला सुरुवात

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची बैठक

तीन वाजता मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची बैठक आहे. पण बहुतांश मंत्री नसल्यानं ही बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत‌ ही बैठक होणार आहे.

ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांच्या भाषणाला सुरुवात

मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध करत ओबीसी नेते एकवटे आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा आज मेळावा आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ या मेळाव्यात उपस्थित आहेत.

काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. ही कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सरकारने कितीही डाव टाकले तरी ...; मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे यांनी विटा येथे मराठा आरक्षणासाठी सभा घेतली. जरांगे म्हणाले, "सरकारने कितीही डाव टाकले तरी मी मागे हटत नाही. त्यांनी गनिमी कावे कळू दिले नाहीत मग आम्ही देखील शिवरायांचे मावळे आहोत आता आमचे गनिमी कावे सरकारला कळणार नाहीत. माझ्या टप्प्यात आला की सोडणार पण नाही. कानाकोपऱ्यात बोलू देणार नाही, सरकारला बोलायच असेल तर सर्वांसमोर बसावं लागेल. सरकारने समिती नेमली वेळ घेतला मग समिती पळायला लागली."

उद्धव ठाकरे शिवतिर्थवर दाखल

उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील धवल गिरी इमारतीमध्ये भीषण आग

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवल गिरी इमारतीमध्ये भीषण आग लागली. इमारतीच्या 11 आणि 12 व्या मजल्यावर आग लागली. घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या 6 जंबो टँकर, स्थानिक पोलीस दाखल झाले आहे. आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

19 नोव्हेंबर छठपूजेच्या निमित्ताने ड्राय डे

नवी दिल्ली : 19 नोव्हेंबर दिल्लीत छठपूजेच्या निमित्ताने ड्राय डे असणार आहे. दिल्ली प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले. रविवारी दारूची सगळी दुकान बंद राहणार आहे.

मध्यप्रदेशात 9 वाजेपर्यंत 10.4 टक्के मतदान

रात्री 9 वाजेपर्यंत मध्य प्रदेशात 10.4 टक्के मतदान झाले. त्याच वेळी, छत्तीसगडमधील 70 जागांवर सरासरी 5.71% मतदान झाले.

मध्य प्रदेशातील 230 आणि छत्तीसगडच्या 70 जागांवर आज मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला पार पडले. मध्यप्रदेशातील 2 हजार 533 आणि छत्तीसगडमधील 958 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. तर जालना जिल्हातील अंबड येथे ओबीसींचा मेळावा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतिदिन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT