esakal Breaking News
esakal Breaking News 
महाराष्ट्र

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीरात प्रसिद्ध केल्याचं ट्विट एमपीएससीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलं आहे.

कार अपघातात तीन बहिणींचा मृत्यू

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात कार उलटल्याने 3 बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात 11 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये मशीदीजवळ गोळीबार, एकाचा मृत्यू

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी उधान आलं आहे.

दुधाच्या दराने गाठला उच्चांक; प्रति लिटरसाठी मोजावे लागणार इतके रूपये

मुंबईत दुधाच्या दराने गाठला उच्चांक काठला आहे. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. आता प्रति लिटर दुधासाठी ५ रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली मध्ये "५० खोके एकदम ओके" चे नारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली मध्ये "५० खोके एकदम ओके" चे नारे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या समोरच ५० खोकेच्या घोषणा दिल्या. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली प्रचार रॅली चे आयोजन करण्यात आलं होतं. मतदारसंघातून ही रॅली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्या यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

चिंचवडमध्ये सापडली १४ लाखांहून अधिकची रक्कम

चिंचवडमध्ये सापडली १४ लाखांहून अधिकची रक्कम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.आज प्रचाराची मुदत संपली आहे. त्यांमुळे आता पैशांचा खेळ चालू झाला आहे. पोलिसांनी रक्कमेसह गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

मेरठमध्ये मोठी दुर्घटना, 3 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली

मेरठमधील दौराला येथील डीपीएस शाळेजवळ लेंटर पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २० हून अधिक लोक दफन झाल्याचा संशय असून तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या वेदनादायक अपघातात सुमारे 9 जण गंभीर जखमी झाले असून, ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस दल आणि मदत कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी रोड शो दरम्यान साधला मतदारांशी संवाद

एकनाथ शिंदे यांनी रोड शो दरम्यान साधला मतदारांशी संवाद आहे. त्यांनी मतदारांना साध घातली आहे

लवप्रीत सिंग 'तुफान'ची अमृतसर तुरुंगातून सुटका

खलिस्तानचा अमृतपाल सिंगचा साथीदार लवप्रीत सिंग 'तुफान'ची अमृतसर तुरुंगातून सुटका

भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो

भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो चालू झाला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीचे नेते पुण्यात तळ ठोकून आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा राजकारणातून निवृत्त

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. शुक्रवारी त्यांनी विधानसभेत शेवटचे भाषण केले. आणि जाहीर केलं होत की विधान संभेतील हे माझं शेवटचं भाषण असेल.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो

भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो चालू झाला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीचे नेते पुण्यात तळ ठोकून आहेत.

श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरच्या ईडी कोठडीत ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दीपक रमदानी आणि काही तुरुंग अधिकाऱ्यांना दिलेल्या पेमेंटची माहिती हवी असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

MPSC चे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला

एमपीएसी विद्यार्थी राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी पवारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलली

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातली केस आणखी लांबणीवर पडली आहे.24 फेब्रुवारी म्हणजे आज याचिकेवर सुनावणी होणार होती ण आता पुढची सुनावणीची तारीख 21 मार्चला होणार आहे. तोपर्यंत कोर्टाचा स्थगिती आदेशही लागू राहणार आहे. 21 मार्चपर्यंत नियुक्त्या करता येणार नाहीत अस कोर्टाने सांगितलं आहे.

मासिक पाळीच्या रजेची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

भारतातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे.

आव्हाडांच्या अडचणीत वाढ; करमुसे मारहाण प्रकरण भोवणार

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती श्री देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होतील.

19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के बसत आहेत. च 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रमविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीविरोधात तक्रार दाखल केली आहे, यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांची दांडी

आज पासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरु होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

12 वर्षांनंतर भारताला रॅपिड-फायर पिस्तूल विश्वचषकात पदक

अनिशने कांस्यपदक जिंकले, 12 वर्षांनंतर भारताला रॅपिड-फायर पिस्तूल विश्वचषक पदक मिळवून दिले.

पुण्यात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; CM शिंदेंचा रोड शो

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुपारी १२ वाजता रोड शो आहे. 

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुपारी १२ वाजता रोड शो आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट धमकी दिली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्याने कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरु होणार आहे. हे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT