Rajesh Tope टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र मास्क मुक्त संदर्भात आरोग्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं असून ते का केलं आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं असून ते का केलं आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

सध्या देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे मास्क मुक्त महाराष्ट्र (Maharashtra) याविषयी सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. आता या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं असून ते का केलं आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या (Centeal Govt.) आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली असून तूर्त मास्क मुक्तीचा विषय नसल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

मास्क मुक्त महाराष्ट्रासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं आहे. हे का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली आहे. आता निर्बंध वाढवण्याचं काहीही कारण नाही. आता निर्बंध कमीच केले जातील. मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) तसा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र आजच मास्क मुक्त केला पाहिजे असं अजिबात नाही. मात्र ज्यांनी मास्क मुक्त केलं त्याचा शास्त्र काय याचा अभ्यास आम्ही करत आहोत. (Mask Free) तूर्त मास्क मुक्तीचा विषय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना पसरवण्यास काँग्रेस (Congress) जबाबदार आहे असल्याच्या पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेनं काम केलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली आहे. राज्यातील प्रत्येक कोरोना पेशंटला प्राधान्य दिलं आहे. कोरोनाकाळातील कामगिरीसाठी अनेक चांगल्या संस्थानी राज्यचं कौतुकही केलं आहे. मात्र पंतप्रधानांनी यावर टीका केली आहे. मात्र आम्ही आमच्या परीने जमेल तेवढं चांगल काम केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

ग्रामीण रुग्णालयाबाबत ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात सिटीसक्यान आणि एमआरआय मशीन उपलब्ध करून देणार आहोत. सरकार 50 पासून 100 खाटा पर्यंतच्या रुग्णालयात या सुविधा सुरु होणार आहेत. घराजवळ उपचार ही संकल्पना घेऊन काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अनेक रुग्णालयांनी पुढे येऊन लस खरेदी केली आहे. आता लस एक्सपायरी होत असल्यान त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यानी या लस घ्याव्यात आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात. लशीची मुदत आणि संबंधित विषयांबाबत केंद्राशी आणि राज्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात ते म्हणाले, कोणतीही गोष्ट लिमिटेड असेल तर ती अँटी ऑक्सिडंट ठरते. द्राक्ष उत्पादकांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दारूला प्रोत्साहन देण्याच्या हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढे कोरोनाबिला संदर्भात ते म्हणाले, कोरोना काळात फटाफट निर्णय घेतले गेले. तेव्हा निधी उपलब्ध नव्हता, मात्र आता निधी उपलब्ध झाला आहे. अजित पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळं राहिलेली बिल लवकर निघतील असेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT