monsoon rains sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मॉन्सून सक्रीय; कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

संपुर्ण राज्य व्यापणारा मॉन्सून आता सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

संपुर्ण राज्य व्यापणारा मॉन्सून आता सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहे.

पुणे - संपुर्ण राज्य व्यापणारा मॉन्सून आता सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहे. कोकण आणि विदर्भात पावसाठी पोषक वातावरण असून, रविवारी (ता. १९) कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रवर तयार झालेल्या बाष्पाच्या ढगांमुळे रविवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष पाऊस केव्हा पडेल, याची चिंता आता बळीराजाला लागली आहे. राजस्थानपासून मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच उत्तर राजस्थानपासून मनीपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम विस्तारला आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटकपासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा संकेत आहे. दडी मारलेल्या पावसामुळे राज्यभरात उकाड्यात वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मॉन्सून सक्रिय होणे म्हणजे काय?

मॉन्सून सक्रिय होण्यासाठी समुद्रावरून बाष्पाचे पुरवठा होणे, हे बाष्पयुक्त वारे जमिनीवर फेकले जाण्यासाठी चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती, कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा अर्थात द्रोणीय स्थिती आदी वातावरणीय घटकांची आवश्यकता असते. मॉन्सून सर्व देशभरात दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे तयार होणाऱ्या मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती यावर मॉन्सूनची सक्रियता अवलंबून असते.

मॉन्सूनची प्रगती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता.१८) पूर्व भारतातील वाटचाल कायम ठेवली आहे. मॉन्सूनने पुढे चाल करत पश्चिम बंगाल, झारखंडसह बिहारच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर व्यापून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

  • कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

  • विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

  • मराठवाडा : नांदेड, लातूर, हिंगोली.

  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Latest Marathi News Updates Live: अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका: “महापालिकेच्या भीतीने एकत्र आले तरी पराभव ठरलेलाच”

PM Narendra Modi: पूराच्या वेदनेत दिलासा ठरली मोदींची भेट; निकिताच्या अश्रूंनी पंतप्रधानांचे मन हेलावले

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद

Nashik News : सुरक्षित अन्न खा, आरोग्य जपा; नाशिक ‘एफडीए’ची सणासुदीच्या काळात विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT