Maharashtra Monsoon Session 2023 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 41,243.21 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे.

राहुल शेळके

Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार, 17 जुलै) सुरू झाले आहे, पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकूण रु. 41,243.21 कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या आहेत.

यापैकी रु. 13,091.21 कोटीच्या अनिवार्य, रु.25,611.38 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु.2,540.62 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने या पुरवणी मागण्या आहेत.

रु. 41,243.21 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा रु. 35,883.31 कोटी एवढा आहे.

या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढील प्रमाणे आहेत :-

जल जीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींसाठी (राज्य हिस्सा) 5856 कोटी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सद्यस्थितीत पात्र लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यासाठी 4,000 कोटी.

राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा अनुज्ञेय हप्ता अदा करण्यासाठी 3563.16 कोटी, मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2,100 कोटी.

मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणेसाठी 1,500 कोटी, केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशनच्या अनसूचित जाती घटकातील लाभार्थ्याकरीता राज्य हिस्सा 1,415 कोटी.

15 व्या वित्त आयोगांतर्गत अनुदान देण्यासाठी 1,398 कोटी, केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी 1,200 कोटी.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरीता 1,100 कोटी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता 1,000 कोटी.

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 1,000 कोटी.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ( POCRA ) प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाहय हिस्सा व राज्य हिस्सा 969 कोटी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा,राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा 939 कोटी.

केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) (अ. ज. घटक) 800 कोटी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपदान/अंशराशीकरण व 7 वा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अदा करणे 798.41 कोटी.

पुरवणी मागण्यातील ठळक मुद्दे

केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 795,01 कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरीता 600 कोटी.

राज्यातील लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतक-यांना अनुदान 550 कोटी, पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्यासाठी 549.54 कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT