महाराष्ट्र

Vinay Mete Accident : एक्सप्रेसवर येणार ITMS प्रणाली; फडणवीसांची सभागृहात माहिती

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis On Vinayak Mete Accident : विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विनायक मेटेंच्या अपघाती निधनावर विधान परिषदे अधिवेशात चर्चेवेळी फडणवीसांनी वरील माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्यांच्या पत्नींनी माझ्याजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचे ते म्हणाले. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली असून, याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीरबाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. त्याने IRB ला मदत मागितल्यावर 7 मिनिटात मदत मिळाली. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे.

अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे ते म्हणाले. लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात दिली.

काय आहे ITMS सिस्टिम

112 ला फोन केल्यानंतर थेट लोकेशन कळणं गरजेचं असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, या सिस्टिमच्या माध्यमातून संपूर्ण सॅटेलाईट इमेजरी किंवा ड्रोनसह एआयचा उपयोग करून या संपूर्ण एक्सप्रेसवेचं काँक्रंट ट्रॅकिंग करता येणार आहे. यामुळे एकाखं मोठे वाहन लेन सोडून जात असेल तर, त्याची माहिती मिळणे सोपे होणार आहे. याशिवाय दुर्देवानं अपघात झाल्यास त्या ठिकाणीचं अचूक लोकशन समजून वेळेत मदत पोहचवण्यास मदत होईल अशी ही इंटेलिजंट सिस्टिम पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर लावण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येईल. झालेली क्षती ही भरून न येण्यासारखी आहे. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ज्या ज्या प्रकारच्या योजना करता येतील त्या त्या करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT