Corona Patients Sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील ७६ टक्के बाधित पाच जिल्ह्यांमध्ये

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या राज्यासह मुंबईत दिवाळीचा उत्साह आहे; मात्र प्रवासी नागरिकांची वाढलेली संख्या व बाजारपेठांतील गर्दी यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात सक्रिय रुग्णांच्या यादीत पुण्यालाही मागे टाकून मुंबई पहिल्या क्रमाकांवर आली आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यांत एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७६ टक्के सक्रिय रुग्ण केवळ मुंबई, पुणे, नगर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात आहेत. मुंबईत सध्या चार हजार ५०३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये त्याचे प्रमाण २८.९५ टक्के आहे. त्यापाठोपाठ पुण्यात तीन हजार २१० (२०.६४ टक्के), नगरमध्ये एक हजार ८७१, ठाण्यात एक हजार ६१८ (१०.४० टक्के) आणि रायगडमध्ये ६२३ (४.०१ टक्के) सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १५ हजार ११९ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या दोन महिन्यांपूर्वी जवळपास दुप्पट होती; मात्र आता एकूण संख्येत घट झाली आहे.

राज्यात २६ ऑगस्ट रोजी ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण होते. एक महिन्यानंतर म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी राज्यात ३७ हजार ८६० सक्रिय रुग्णसंख्या नोंदवली गेली; तर २५ ऑक्टोबर रोजी २३ हजार १८४ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांत मुंबई सक्रिय रुग्णांमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होती; मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आली आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी असला, तरी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी स्थानिक प्रशासनांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही राज्य सरकारकडून केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT