Ameya Khopkar Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

MNS : अमेय खोपकर विरुद्ध मनसे? एक ट्वीट आणि पक्षापासून फारकत घेतल्याची चर्चा

मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिवाळीत एक ट्वीट केलं आहे. त्यावरुन ही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी आली की त्या अनुषंगाने फटाके उडवण्यावरुन होणारे वादही आलेच. हे काही नवीन राहिलेलं नाही. मात्र यंदाच्या दिवाळीत चर्चा होतेय मनसेच्या फटाक्यांबद्दलच्या भूमिकेची. मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिवाळीत एक ट्वीट केलं आहे. त्यावरुन ही चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले होते अमेय खोपकर?

"ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा", असं ट्वीट अमेय खोपकरांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी मनसेच्या भूमिकेशी फारकत घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनसेची फटाक्यांसंदर्भातली भूमिका काय आहे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी ब्लू प्रिंट सादर केली होती. या ब्लू प्रिंटमध्ये मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. यामध्ये लिहिलं होतं की, गाड्यांचे हॉर्न, भोंगे,फटाके, लाऊडस्पीकर इत्यादी ध्वनी प्रदूषण करतात. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाला आमंत्रण मिळते.

आता अमेय खोपकर यांनी केलेलं हे ट्वीट मनसेच्या भूमिकेशी फारकत घेणारं आहे. त्यामुळे आता यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय येते, याकडे लक्ष लागून आहे. यावर राज ठाकरे अधिकृतपणे भाष्य करणार की याविषयी अमेय खोपकर स्पष्टीकरण देणार याबद्दल येणाऱ्या काळातच ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT