illegal liquor

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

Maharashtra liquor policy : राज्य सरकारची नवी 'महाराष्ट्र मद्य श्रेणी' अडचणीत?; बड्या कंपन्यांनी कोर्टात दिलं आव्हान!

Latest update on the Maharashtra liquor policy : नवीन मद्य श्रेणीमुळे ४० टक्के मद्य विक्री घटल्याचा आरोप या मद्य कंपन्यांनी केला आहे.

Mayur Ratnaparkhe

New Maharashtra Liquor Category Policy : राज्य सरकारची नवी ‘महाराष्ट्र मद्य’ श्रेणी गोत्यात येण्याची चिन्हं आहेत. कारण, या नव्या मद्य श्रेणीविरोधात काही मद्य कंपन्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्य सरकारच्या या नवीन मद्य श्रेणीमुळे ४० टक्के मद्य विक्री घटल्याचा आरोप या मद्य कंपन्यांनी केला आहे. नव्या धोरणानुसार १३ मद्य कंपन्यांना परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी सात कंपन्यांनी मद्य उत्पादन सुरू केलं आहे.

खरंतर बंद पडलेल्या मद्य उत्पादक कंपन्यांना लाभ पोहचण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही  नवीन ‘महाराष्ट्र मद्य श्रेणी’ आणल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र या नव्या मद्य श्रेणीमुळे समान संधीच्या तत्वाचे उल्लंघन झाले असल्याचा आणि मद्य विक्री घटल्याचा आरोप काही बड्या मद्य कंपन्यांनी केला आहे.

या कंपन्यांच्या मते महाराष्ट्र शासनाने व्यवसायातील स्पर्धा कृत्रीम केली आहे. यामुळएच  नव्या मद्यश्रेणीला मुंबई उच्च न्यायालयात या कंपन्यांकडून आव्हान दिलं गेलं आहे. राज्यात विदेशी मद्याचे उत्पादन घेणाऱ्या एकूण ७० कंपन्या पैकी १६ कंपन्या कसेबसं उत्पादन करतात. तर उर्वरती या बंद कंपन्यांना चालना मिळावी यासाठी ही नवी मद्य श्रेणी आणली गेली होती. नव्या धोरणाचा शासन निर्णय जारी होताच २५ मद्य कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ कंपन्यांना परवाने दिले गेले आणि सात कंपन्यांनी मद्य उत्पादन सुरु केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: सिडकोचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! दररचनेत बदल करण्याचे निर्देश, राज्य सरकारचं मोठं पाऊल

Year End : गुगलवर सर्च झालेल्या सगळ्यांत वाईट गोष्टी कोणत्या? 2025 वर्षातील धक्कादायक रिपोर्ट लिक

Latest Marathi News Live Update : वलसाडच्या उंबरगाव तालुक्यातील गावात प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

Vidhan Bhavan ruckus case : विधानभवनात आव्हाड अन् पडळकर समर्थकांच्या राडा प्रकरणी अहवाल सादर

Railway Food: एअरलाईन्ससारखे ताजे अन्न आता ट्रेनमध्ये मिळणार! आयआरसीटीसीकडून मोठी सुधारणा; पण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT