महाराष्ट्र

विदर्भातील आमदारांची अधिवेशनात अनास्था 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - विदर्भ-मराठवाड्यातील लोकांच्या प्रश्नाला वाचा फुटावी, विकासाची कामे मार्गी लागावीत आणि या भागातील लोकांना न्याय मिळावा या उदात्त हेतूने नागपूरमध्ये होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाऐवजी या वेळी पुणे- मुंबईतील प्रश्नांनीच हल्लाबोल केला आहे. 

आज दोन्ही सभागृहांत झालेल्या कामकाजावर विदर्भ किंवा मराठवाड्यापेक्षा मुंबईतील विविध विषयांचा बोलबाला होता. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, कापूस आणि धानाचा प्रश्न वगळता संपूर्ण अधिवेशनावर विदर्भ बाहेरील समस्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.विधानसभेत आज झालेल्या पहिल्याच प्रश्नोत्तराच्या तासाला राज्याच्या विविध भागातील वेगवेगळ्या प्रश्‍नांवर सरकाचे लक्ष वेधणारे तब्बल ७५ प्रश्‍न चर्चेसाठी मांडण्यात आले होते. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील केवळ १३ प्रश्न होते. 

विधान परिषदेत आज चर्चेसाठी मांडण्यात आलेल्या ८१ प्रश्नांमध्ये २८ प्रश्न या भागातील होते. त्यामध्ये मुंबईतील म्हाडा, एसआरए प्रकल्पातील घोटाळे, सागरी किनारा मार्ग, संक्रमण शिबिर, मेट्रो प्रकल्प, एमएमआरडीए, पुण्यातील डीएसके उद्योगसमूहाने ठेवीदारांची केलेली फसवणूक, महापालिकेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्पातील गैरव्यवहार, नवी मुंबई विमानतळ आदी विषयांवरीलच प्रश्नांचा भडिमार होता. विधानसभेत लक्षवेधीमध्येही मुंबई विद्यापीठातील ऑनलाइन मूल्यांकनामुळे रखडलेले निकाल, मुंबईतील रक्तपेढ्यांधील गोंधळ, नाशिकमध्ये गाजलेले बालमृत्यू प्रकरण, ऊसदराचा प्रश्न अशा बहुतांश सर्वच लक्षवेधी विदर्भाबाहेरील होत्या. 

विधान परिषदेत मिहानमधील समस्या आणि रामदेव बाबांच्या फूड पार्कसाठी दिलेली जमीन, बोंड अळीमुळे संकटात सापडेला कापूस उत्पादक शेतकरी या लक्षेवेधी होत्या. केवळ विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील सत्ताधारी पक्षाचा दोन्ही सभागृहांतील प्रस्ताव वगळता बहुतांश कामकाजात विदर्भ-मराठवाडा बाहेरील प्रश्नांचाच भरणा होता.

सध्या प्रश्न किंवा लक्षेवेधींसाठी ऑलनाइन पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र मुळातच मुंबई- पुण्याबाहेरील आमदार अधिक प्रश्न मांडत नसल्याचे विधान भवनातील सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT