BRS ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

BRS: "काना मागून आली अन् तिखट झाली.." मविआ, महायुतीला धक्का देण्यासाठी 'हा' पक्ष सज्ज

रुपेश नामदास

Latest Marathi News: मागील काही दिवसापासून बीआरएसच्या (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्रातील सभांच्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीआरएस राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीराला तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार असल्याची माहिती माणिकराव कदम यांनी दिली आहे. Marathi Tajya Batmya

दरम्यान आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्वच महत्वाच्या बीआरएसकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याच्या पक्षात हालचाली सुरु आहेत. तसेच नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात आगामी निवडणुकांचा मुद्दा महत्वाचा असणार आहे.

तर या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा, कोअर कमिटी स्थापना अभियान, महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी समोरील संकटे अशा विविध प्रश्नांवर शिबिरात चर्चा होणार आहे. तर या शिबिराला आलेल्या शिबिरार्थींची राहण्याची व्यवस्था गुरुद्वारा इथल्या पंजाब भवन इथे करण्यात येणार आहे. Latest Marathi News

दरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मराठवाडयात सभा घेऊन पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.

पहिल्या टप्प्यात सभा व काही नेते मंडळीच्या मदतीने केसीआर यांनी स्वतः पायाभरणी केली. त्यानंतर पक्षाची भूमिका मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने मराठीतच प्रचार मोहिम हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT