Omicron variant Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आणखी 4 ओमिक्रॉन रुग्णांची भर; 3 रुग्णांचा परदेशातून प्रवास

मिलिंद तांबे

मुंबई : आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National institute of virology) दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 4 रुग्ण ओमिक्रॉन बाधित (Omicron patients) आढळले आहेत. यापैकी 2 रुग्ण उस्मानाबाद (Osmanabad), 1 रुग्ण मुंबई (Mumbai) येथील तर 1 रुग्ण बुलढाणा (buldhana) येथील आहे. यातील 3 रुग्णांचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 32 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई 13, पिंपरी चिंचवड 10, पुणे मनपा 2, उस्मानाबाद 2, कल्याण डोंबिवली 1 नागपूर 1, लातूर 1 वसई विरार1 आणि बुलढाणा 1 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 25 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या 4 रुग्णांचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले होते.या 4 रुग्णांपैकी 1 स्त्री तर 3 पुरुष असून ते 16 वर्षे ते 67 वर्षे वयोगटातील आहेत. सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत. उस्मानाबाद येथील एका रुग्णाने शारजा प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे.बुलढाणा येथील रुग्णाने दुबई प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्तीने आयर्लंड प्रवास केला आहे. या पैकी 3 रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एक रुग्ण लसीकरणास पात्र नाही सर्व रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात असून त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

32 अहवाल प्रलंबित

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 447 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 32 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT