Omicron variant Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आणखी 8 ओमिक्रॉन रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या 40 वर

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आणखी 8 रुण ओमिक्रॉन बाधित (Omicron patients) आढळले आहेत. यापैकी 6 रुग्ण पुणे, 1 रुग्ण मुंबई आणि 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात (Maharashtra omicron update) एकूण 40 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यात मुंबई- 14, पिंपरी चिंचवड 10, पुणे ग्रामीण 6, पुणे मनपा 2, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1 नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरार 1 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 25 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह (RTPCR test negative) आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ओमिक्रॉनबाधित आढळलेल्या 8 रुग्णांचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.या 8 रुग्णांपैकी सर्व रुग्ण पुरुष असून ते 29 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत. नवीन रुग्णांपैकी 7 रुग्ण लक्षणे तर 1 रुग्ण लक्षणेविरहित सौम्य स्वरुपाचे आहेत. यापैकी पुणे येथील 4 रुग्णांचा दुबई प्रवास, आणि 2 रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील 1 रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील 1 रुग्णांचा नाजेरिया प्रवास आहे.या 8 रुग्णांपैकी 2 रुग्ण रुग्णालयात तर 6 जण घरी विलगीकरणात आहेत.

या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. सर्व रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 525 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 79 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

मुंबईतील ओमिक्रॉन बधितांची संख्या 14 वर

मुंबईत आज एका ओमायक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या 14 वर पोचली आहे. 29 वर्षीय पुरुष निवार्क येथून 9 डिसेंबर रोजी मुंबईला आला होता. या रुग्णाची विमानतळावर कोविड चाचणी सकारात्मक आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीचे तीन मात्रा (फायजर) पूर्ण झाल्या आहेत. तसेच संपर्कातील अतिजोखमीचे दोन व्यक्तींचा अहवाल नेगेटिव्ह आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. शिवाय खबरदारीची उपाययोजना म्हणून कोविड बाधित रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही. तर ओमायक्रॉन बाधित 13 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा गड ढासळणार, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT