महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार घरबसल्या

सूरज यादव

सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

मुंबई - राज्यात आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं सोपं झालं आहे. मंगळवारी राज्य सरकारने 50 विभागिय वाहतूक कार्यालयांसाठी दोन आदेश जारी केले आहेत. यामध्ये पहिल्या आदेशानुसार लर्निंग लायनन्ससाठी आता लोकांना घरबसल्या फक्त आधार कार्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. तसंच याची टेस्टसुद्दा ऑनलाइन घेतली जाणार आहे. आधार कार्डवरून व्यक्तीची ओळख पटवण्यात येईल आणि घरबसल्या लर्निंग लायसन मिळेल. दुसऱ्या आदेशात डीलर्सना आता नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांच्या नोदणीसाठी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. तेसुद्धा आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शक्य आहे.

महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत माहिती देतील. या सुविधा सुरु झाल्यानंतर आरटीओमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. यामुळे भ्रष्टाचार आणि एजंटच्या माध्यमातून लायसन्स देण्याचं कामही बंद होईल. लोकांचा वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी वाचतील. लायसन्स रिन्यू करण्यासाठी, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसह 18 कामांसाठी आता आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून होईळ. या वर्षी मार्चापासूनच या सुविधांसाठी आधारचा वापर केला जात आहे.

महाराष्ट्र वाहतूक विभाग दर वर्षी 20 लाखांहून अधिक लर्निंग लायनन्स जारी करण्यात येतात. तर इतक्याच दुचाकी आणि नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांचे रजिस्ट्रेशन दरवर्षी होते. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने वाहन 4.0 आणि सारथी 4.0 सिस्टम तयार केली आहे. याच्या माध्यमातून नोंदणी आणि लर्निंग लायसन्स जारी केले जात आहे. आता आधार कार्ड नंबर आणि ऑनलाइन टेस्ट देताच लर्निंग लायसन्स मिळणार आहे. नव्या सिस्टिमनुसार टेस्टमध्ये तुम्हाला रोड सेफ्टी संदर्भात काही व्हिडिओ दिसतील. यानंतर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. ज्यामध्ये 60 टक्के गुण मिळवल्यास लायसन दिले जाईल.

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सस तयार करण्यासाठी आणि रिन्यूबाबत नविन गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार लर्नर लायसन्स मिळवण्याची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन होईल. अर्ज करण्यापासून ते लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यासोबत इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंटसचा वापर होणार आहे. यातून मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रिन्यूअल यांसाठी वापर होईल.

नव्या नियमावलीचा हाच उद्देश आहे की, नव्या गाडीच्या रजिस्ट्रेशनची नोंदणी प्रक्रियासुद्धा सुलभ करता येईल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा रिन्यूअल आता 60 दिवस आधीच करता येणार आहे. याशिवाय टेम्पररी रजिस्ट्रेशनचा कालावधीसुद्दा एक महिन्यावरून 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. हे काम ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्या होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT