Police  esakal
महाराष्ट्र बातम्या

Police Inspector Transfer : पोलिस दलात फेरबदल! राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या आणि विनंती बदल्या झालेल्या आहेत.

मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलिस निरीक्षांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत.

राज्य पोलीस दलात फेरबदल करण्याचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदलीनंतर गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या 449 पोलीस निरीक्षकांमध्ये मुंबईतील 79 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.

यापूर्वी जूनच्या सुरुवातील 28 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना थेट सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. तर मुंबई पोलिसांतील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. मुंबई शहरातील 65 पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या होत्या.

एकूण 65 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत 43 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आलेली. यामुळे मागील अनेक काळापासून रखडून पडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला होता. सध्या मुंबईतील अनेक पोलीस स्थानकात नवे पोलीस निरीक्षक कार्यभार स्वीकारला आहेत.

दरम्यान, मागील महिन्यात पोलिस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या होत्या. राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढले होते. यामध्ये ९ पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या . सर्व बदल्या मुंबई पोलिस दलात करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT