Eknath Shinde Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : शिंदे-ठाकरेंच्या वादात शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक; चर्चांना उधाण

एकीकडे बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Deepali Sayyad On Eknath Shinde : एकीकडे बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अनेकांनी शिवबंध सोडून शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष आणि कार्यकर्ते कसे एकत्र ठेवायचे असा मोठा पेच निर्माण झाला आहे. हे सर्व होत असतानाच मात्र, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

सय्यद यांनी शिंदेंची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. सय्यद यांच्या या कौतुकानंतर दीपाली सय्यददेखील शिंदे गटात जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

दीपाली सय्यद म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. एवढेच नव्हे तर, ते कामं करण्याबरोबर अनेकांना भेटीगाठींसाठीदेखील पुरेसा वेळ देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची कामं युद्धपातळीवर होत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे कोणतही काम घेऊन गेलो की ते त्वरेने पूर्णत्वास नेली जात आहेत. शिंदेंनी जो कामाचा झपाटा लावला आहे तो कमालीचा आहे असी स्तुतीसुमनं सय्यद यांनी गायली आहेत. जर एखादी व्यक्ती झापाटूव कामं करत असेल तर, त्याचं कौतुकदेखील होण गरजेचं असल्याचे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Maharashtra Latest News Live : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं कार्याचं कौतुक

loan Recovery: थकीत कर्जवसुली प्रकरण तापले; सील केलेल्या मिळकतीत अनधिकृत प्रवेश, पोलिसांत तक्रार

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये मोठी कारवाई; ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, महिला आरोपीवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT