Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane: लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे..नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार

अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. अशा शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.(Maharashtra Politics bjp mla Nitesh Rane ncp Ajit Pawar height )

'लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.' अशा आशयाचे ट्विट राणे यांनी करत अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांना कालच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. "नितेश राणे म्हणाले होते, शरद पवारसाहेब कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत" असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता.

त्यावर अजित पवार म्हणाले की, "टिल्ल्या लोकांनी असं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते उत्तर देतील. असल्यांच्या नादी लागत नसतो मी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT