Uddhav Thackeray Narendra Modi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "मोदी नावाचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील"

"खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था झाली आहे"

वैष्णवी कारंजकर

मोदी नावाचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नुकतीच उद्धव ठाकरेंची सभा पाचोरा इथं पार पडली. त्यानंतर बावनकुळेंनी हा घणाघात केला आहे.

बावनकुळे नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्यानंतर टीका टिप्पण्या सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, "मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशानं पसंती दिली आहे. मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली पण ते त्यात अपयशी ठरले. खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था झाली आहे."

बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. "संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करताय, मोदी नावाचं वादळ येणार आहे. संजय राऊत सवयीप्रमाणे बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणं नाही. पाठीत खंजीर खुपसणं त्यांच्या रक्तात आहे", असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT