maharashtra politics crisis NCP leaders along with two BJP MLAs attend  esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या दोन आमदारांनी जयंत पाटलांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद; चर्चेला उधाण

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

धनश्री ओतारी

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी तिथे घेतलेल्या एका सभेत भाजप आमदारांनी उपस्थिती लावल्याने राजकीय गोटात चर्चेला उधाण आलं आहे.(maharashtra politics crisis NCP leaders along with two BJP MLAs attend)

सहकार नेते माजी आमदार भय्यासाहेब तिडके यांचा 75 व्या अमृत महोत्सव सोहळा मुर्तीजापूरमध्ये काल सोहळा पार पडला. यावेळी पाटील यांच्या हस्ते 'सहकाराचा मानबिंदू' या ॲड. भैयासाहेब तिडके अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यासपीठावर उपस्थिती होती. विशेष म्हणजे, या सोहळ्याला भाजपचे दोन आमदारही उपस्थित होते. मुर्तीजापूर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे आणि अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे हे भाजपचे आमदार उपस्थित होते. इतकेच नव्हे तर कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी, भाजप नेत्यांनी एकत्र भोजनाचा आस्वादही घेतला. यासोबत या आमदारांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार तिडके यांचे तोंड भरुन कौतुकही केले.

या सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात भाजपच्या दोन आमदरांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सत्ता पालटानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच असं भाकित वर्तवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

Pune: मेट्रो प्रवाशांसाठी अलर्ट! कच्चे मांस आणि सुके मासे घेऊन प्रवास केल्यास ट्रेनमध्ये ‘नो एंट्री’; कठोर नियम लागू

Solapur Crime : घरगुती वादातून मुलाने केला वडिलांचा घात; वन्यप्राणी हल्ल्याचा बनाव करत लपवला होता गुन्हा!

SCROLL FOR NEXT