महाराष्ट्र बातम्या

अकेले हम अकेले तुम...शिरसाटांनी सुप्रिया सुळेंना दिलं प्रत्युत्तर

नवं सरकार स्थापन होऊन महिना पुर्ण झाला पण अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही.

धनश्री ओतारी

याआधीचं सरकार अकेले हम अकेले तुम… उद्धव साहेब एकिकडे, अजितदादा एकिकडे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.(Maharashtra Politics crisis Supriya Sule statement on sanjay shirsat reaction)

नवं सरकार स्थापन होऊन महिना पुर्ण झाला पण अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

सध्याचं सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए… असं दोघांसाठी दोघांचच बनलेलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळे यांना त्यांच्याच खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्याचं सरकार एक दुजे के लिए असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये अकेले हम, अकेले तुम अशी स्थिती होती. उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकेकट्याने कारभार पाहात होते, मात्र सध्याचं सरकार संगनमतानं काम करतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं शिरसाट म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

भाजपच्याच खासदाराने सांगितलं. एक दुजे के लिये सरकार आहे. दोनच लोकांचं सरकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. माझ्याच लोकसभा मतदार संघात काही कामांसाठी पालकमंत्र्यांकडे जातो. प्रशासनाला निर्णय घ्यायला पर्याय नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT