Aaditya Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज्यपाल कोश्यारींना हटवावं का? आदित्य ठाकरेंच्या पोलने दिलं उत्तर

राज्यपाल कोश्यारी सातत्याने महाराष्ट्र तसंच राज्यातल्या महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. त्यांच्या विरोधात निषेध करत आंदोलनंही केली जातात आहेत. तसंच राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून राज्यपाल पदावरुन हटवा, अशी मागणी करणाऱी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्या पोलमधूनही अशी मागणी होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर एक पोल घेतला. त्याचा निकाल आता समोर आला आहे. या निकालातूनही राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी समोर येत आहे. महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी ट्वीटर पोलमध्ये विचारला आहे. त्याखाली त्यांनी होय, उशीर झाला आहे, नाही, मी महाराष्ट्र द्वेषी असे तीन पर्याय दिले आहेत.

या तीनपैकी सर्वाधिक मते होय अशी आली आहे. जवळपास 79.5 टक्के नागरिकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. तर १३.४ टक्के लोकांना असं वाटत आहे की आता या गोष्टीला उशीर झाला आहे. ७.१ टक्के नागरिकांनी मात्र राज्यपालांना हटवण्याच्या या मागणीला नकार दिला आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

काय होतं राज्यपाल कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य?

"तुमचा आदर्श कोण आहे, असं पूर्वी विचारलं जायचं तेव्हा जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अशी उत्तरं दिली जात होती. पण महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही. इथं खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी नव्या काळातले आदर्श आहेत".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT