Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'गद्दार ते गद्दारच शेवटी', भाजप नेत्याच्या पोस्टमुळे खळबळ' जागा वाटपापूर्वीच युतीत बिघाड

लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

धनश्री ओतारी

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण युतीच्या सरकारमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमधून भाजप इच्छूकानं शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

या पोस्टमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या टीकेनंतर नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, ही पोस्ट आता डिलीट करण्यात आली आहे.

तर मविआमध्ये ज्येष्ठ नेत्यांना टेन्शन

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं जाहीर तर केलं. पण जागा वाटप करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर कायम आहे.

गेल्या काही काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. 17 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत. तसंच विधानसभेच्या क्रमांक दोनच्या जागांवर लक्ष केंद्रीत करा असाही आदेश त्यांनी दिल्याचे समजते.

2019 विधानसभा निवडणुकीत 40 हून अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेसोबत झाल्याचं दिसून येतं.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं.

अडीच वर्षं मविआची सत्ता होती. पण प्रत्यक्षात एकत्र निवडणूक लढवताना या तीन पक्षांसमोर अनेक आव्हानं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT