maharashtra Politics minister without account shiv senas uddhav thackeray push to rebel independent mlas court mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

बंडखोर झाले बिनखात्याचे मंत्री

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेतील बंडखोरी मंत्र्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बडगा उभारला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेतील बंडखोरी मंत्र्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बडगा उभारला. राज्यातील सत्तासंघर्ष एकीकडे सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत बंडखोर मंत्र्यांनाच बिनखात्याचे मंत्री केले. बंडखोरी केलेल्या पाच कॅबिनेट आणि चार राज्य मंत्र्यांची खाती काढून टाकून त्यांना डच्चू दिला. राज्याचे कामकाज अविरत सुरू राहावे आणि पावसाळ्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने अनुपस्थित मंत्र्याची खाती इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

एरवी मंत्रिपदे मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू असताना आज मात्र सढळ हस्ते मंत्रिपदांचे शिवसेनेने वाटप केले आहे. जनहिताची कामे अडकून राहू नयेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६-अ मध्ये अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांस इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येतील अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

शंभूराज देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बनसोडे (गृह ग्रामीण), विश्वजित कदम, (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन), सतेज ऊर्फ बंटी पाटील, (रा.उ.शु.) यांना दिली आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त तनपुरे (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज ऊर्फ बंटी पाटील (अन्न व औषध प्रशासन), आदिती तटकरे (सांस्कृतिक कार्य) यांच्याकडे दिली आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त तनपुरे (महसूल), सतेज ऊर्फ बंटी पाटील (ग्राम विकास), आदिती तटकरे (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य) यांना दिली आहेत. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडील खाती (कंसात) आदिती सुनील तटकरे (शालेय शिक्षण), सतेज ऊर्फ बंटी पाटील (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय भरणे (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे सोपविली आहेत.

मंत्र्यांकडील खातेवाटपात बदल

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादा भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT