Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी माझा व्हिप लागू होणार; आव्हाडांनी दिला थेट इशारा

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवारांकडेच असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वेगवान घडामोडी घडून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच आपल्यासोबत ३५ आमदार असल्याचंही सांगितलं. पण आता यामध्ये जितेंद्र आव्हाडांची भूमिका महत्वाची असणार आहे. कारण त्यांची मुख्य प्रतोदपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी माझा व्हिप लागू होणार, अशा शब्दांत आव्हाडांनी बंड करणाऱ्या आमदारांना आव्हान दिलं आहे. (Maharashtra Politics My whip will apply for NCP MLAs Jitendra Ahwara warning)

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका स्पष्ट केली. नव्या राजकीय समिकरणासाठी आपल्याला कोणाचाही फोन आलेला नाही. मला याबाबत विचारलं नाही हे मी माझं भाग्य समजतो. मी मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं.

बंडखोर आमदारांना इशारा

दरम्यान, राष्ट्रवादीचे काँग्रेसचा नेता एकमेव आहे तो म्हणजे शरद पवार. पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शरद पवारांकडेच असून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार माझी प्रतोदपदी नेमणूक केली आहे. त्यामुळं मी जो व्हीप काढीन तो आमदारांना लागू होणार आहे.

...तर बाजुला बसायचं होतं

कारवाई भीती होती तर बाजूला बसायचं होतं. आमदारांनी गेल्या २५ वर्षांपासून मंत्रिपदं भोगली आहेत. शरद पवार अजून तुम्हाला काय देणार? स्वतःचं घर देणार का? ज्या नेत्यानं मेहनत केली, केवळ फोनवरुन मंत्रीपद दिली. अशा माणसाला त्याच्या अखेरच्या काळात तुम्ही दुःख दिलं आहे. ज्या बापानं समृध्दी दिली, मान सन्मान दिले त्यानंतर त्याच्य़ाशी अशा परिस्थितीत वागणं हे माणुसकीला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या घराघऱात दुःखाची छाया आहे, अशा शब्दांत आव्हाडांनी आपली भूमिका मांडल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT