Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : अदानी- पवार भेटीवर नाना पटोलेंचं अजब वक्तव्य; चर्चेला उधाण

अदानी- पवार यांची पुन्हा भेट

धनश्री ओतारी

अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपती एक असलेले उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यांच्या भेटीमुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच अदानी- पवार भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब वक्तव्य केलं आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. (maharashtra politics Nana Patole statement on Sharad Pawar Meet Adani )

काय म्हणाले नाना पटोले?

“या भेटीशी आमचं काही घेणंदेणं नाही. लोकांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.शरद पवार यांचा पक्ष वेगळा आहे. अदानी त्यांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. व्यक्तीगत अदानी आणि आमचा काही वाद नाही. देशाची मालमत्ता विकण्याच काम होत आहे त्यासाठी आम्ही प्रश्न विचारत राहणार आहोत”

...म्हणून भेट; पवारांनी केला खुलासा

सिंगापूर येथील एक प्रतिनिधीमंडळ माझ्याकडे आलं होतं आणि त्यांना काही टेक्निकल मुद्द्यांवर उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती.

यादरम्यान गौतम अदानी आणि सिंगापूर प्रतिनिधीमंडळ यांच्यात ही बैठक झाली. मात्र हा टेक्निकल मुद्दा होता. त्यामुशे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही.

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही बैठक तब्बल अर्धा तास चालली होती. शरद पवारांनी या बैठकील टेक्निकल म्हणत विषय टाळला असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात गौतम अदानी यांची बाजू घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT