Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अन् राजकीय गोंधळात राणेंनी ठाकरेंना दिलं मासे खाण्याचं आमंत्रण

ठाकरे हे आमंत्रण स्विकारतील का?

धनश्री ओतारी

उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. एकेकाळी शिवसेनेत शब्दाला वजन असलेले राणे बाहेर का पडले, उद्धव आणि राणे यांच्यात नेमका काय वाद झाला याबाबत अजूनही उत्सुकता आहे. अशातच राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेलाय. अशातच, नारायण राणे यांनी ठाकरेंना मासे खाण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे ठाकरे हे आमंत्रण स्विकारतात का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Maharashtra Politics Narayan Rane Thackeray invitation to eat fish)

झी मराठी वाहिनीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. गुप्तेंच्या शोमध्ये जादूचा फोन हा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या फोनवरुन पाहुणे स्थळ-काळाच्या बंधनाविना अगदी कोणालाही फोन करु शकतात.

हीच संधी साधत नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन केला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना मासे खाण्याचं आमंत्रण दिले.

नेमकं काय म्हणाले राणे?

जय महाराष्ट्र उद्धव साहेब, नारायण राणे बोलतोय. तब्येत कशी आहे? बरी आहे ना? कोकणात येऊन तुम्ही रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केलात. पण तुम्हाला माहित असेल, तर शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणी माणसाची साथ लाभली आहे. कोकणातून आलेल्या माणसांनी शिवसेना वाढवली, किंबहुना आजही वाढवत आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

बारसू रिफायनरी प्रकल्प कोकणच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध नको, सहकार्य करा. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. कोकणाने बाळासाहेबांना प्रेम आणि विश्वास दिला. तुम्ही त्यापैकी एक तरी द्या. कोकणात मासे खायला या, पण विरोध करायला नको, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT