Maharashtra Politics Naresh Mhaske on Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: पवार घराण्याचे वाद चव्हाट्यावर? नरेश म्हस्केंचा अजित पवारांवर खळबळजनक आरोप

म्हस्के यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात पवार घराण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात पवार घराण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत चर्चेला उत आला आहे. (Maharashtra Politics Naresh Mhaske on Ajit Pawar )

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा असं सांगण्यासाठी अजित पवार खुद्द अनेकांना फोन करत होते असा खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला आहे. तसेच, तुम्ही आधी तुमच्या घरातलं पाहा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करा. असही म्हस्के यावेळी म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आलं आहे.

जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. या अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली.

खासदार शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. भाजपकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. यात भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

Umarga Crime : सावकारी जाचातून महिला फार्मसिस्टचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

DGP Sadanand Date : ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी मोडून काढू

SCROLL FOR NEXT