Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा नाशकात करेक्ट कार्यक्रम? गटाला पडणार मोठं खिंडार

आज शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आज शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊत यांचा हा दौरा आहे. मात्र, या दौऱ्यापुर्वीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पूर्वी देखील नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज देखील अनेक कार्यकर्ते हे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला नाशिकमध्ये धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसून येत आहेत.

ठाकरे गटाचे दोनचार नव्हे तर 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी ट्विट सूचक ट्विट केले आहे.

'आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चपराक बसेल खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल बाळासाहेबांच्या नावावर राष्ट्रवादीचे दुकान चालवले म्हणून खरे शिवसैनिक एकेक करून सोडून चालले ' असं ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे.

जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार नाशिकला येऊन पक्षाची बांधणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT