prakash ambedkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: पहाटेच्या शपथविधीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, म्हणाले अजित पवारांनी तेव्हा...

राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता पहाटेची शपथविधी पुन्हा चर्चेत

धनश्री ओतारी

राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता पहाटेची शपथविधी पुन्हा चर्चेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (maharashtra politics Prakash ambedkar On Morning Swearing )

केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. बदलापूरमधील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर?

अजित पवार यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले. असं आंबेडकर म्हणाले.

तसेच, महाविकास आघाडीसोबत आमचा काही समझौता नाही, संबंध नाही. काँग्रेस आणि एनसीपीने जाहीर केलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझौता करु शकत नाही, त्यामुळे त्या वज्रमूठ सभेचा आणि आमचा काही संबंध नाही. असही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT