Sanjay Raut criticizes Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना आमच्या रक्तानं बनलेली पार्टी, पैशानं विकत घेणार का?

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना आमच्या रक्तानं बनलेली पार्टी आहे, कोणीही विकत घेऊ शकत नाही.

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमच्या रक्तानं बनलेली पार्टी आहे. कोणाकडं, तरी पैसा आहे म्हणून कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्यावर कोणतंही संकट नाही. आमच्यासाठी पक्षाच्या विस्ताराची ही संधी आहे. पक्षाचे विचार आणि भविष्यातील संधींवर आम्ही विचारमंथन करणार आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडावर जोरदार टीका केलीय.

राऊत म्हणाले, 'आज हजारो शिवसैनिक (Shiv Sainik) आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. आता माझ्याकडं सांगली आणि मिरजेहून शिवसैनिक आलेत, ही पक्षाची मोठी आणि खरी ताकद आहे. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं हे सगळं घडतंय.'

दहा बंडखोर आमदारांनी आमच्याशी बातचीत केलीय. आसामच्या हॉटेलमधील 10 जणांनी आमच्याशी संपर्क साधलाय. शिवाय, राष्ट्रवादीसोबत आमची बैठकही झालीय. त्या ठिकाणचे 10 जण माघारी यायला तयार आहे, त्यामुळं आमचं सरकार स्थिर आहे. शिवसैनिकांचा अजून विस्फोट झालेला नाहीय. जर झाला तर वेगळं चित्र असेल. आम्ही संयम राखण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची आमची जबाबदारी नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT