Sanjay Raut Trolled esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut Trolled: कुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विनच्या...राऊतांच्या पोस्टची युजर्सनी उडवली खिल्ली

नागपुरात मी आणि उद्धव ठाकरे बॉम्ब फोडणार असं वक्तव्य नागपुरात दाखल होण्यापूर्वी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत नागपुर येथे दाखल झाले आहेत. यापूर्वी राऊत यांनी नागपूरला बॉम्ब फोडणार असे विधान केले होते. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. (Maharashtra Politics Sanjay Raut trolled on social media Aaditya Thackeray )

नागपुरात मी आणि उद्धव ठाकरे बॉम्ब फोडणार असं वक्तव्य नागपुरात दाखल होण्यापूर्वी राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर आज विधीमंडळात ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान, ठाकरेंच्या भूमिकेनंतर शुभ प्रभात म्हणत राऊत यांनी सोशल मीडियावर सुतळी बॉम्ब आणि अगरबत्तीचा फोटो शेअर केला. त्यांनी ही पोस्ट अधिकृत सोशल अकाऊंट्स वर शेअर केली.

मात्र, त्यांच्या या पोस्टमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. काही युजर्सनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

युजर्स काय म्हणाले?

कुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विन च्या ढुंगणामागे की घरकोंबड्याच्या ढुंगणामागे अशा शब्दात युजर्सने राऊतांच्या पोस्टची खिल्ली उडवली आहे. तर, साहेबांचा सुतळी बॉम्ब फुटणार आणि शिल्लक आमदार खासदार शिंदे गटात जाणार. दुपारी 1 वाजता सकाळ होते का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच, अशीच आमच्या बाळासाहेबांची शिवसेना जाळत आणली आहे... एक दिवशी स्फोट नक्कीच करणार तुम्ही... संपवणार सगळं. हा बॉम्ब तुमच्या बुडाखाली लावला पाहिजे म्हणजे तुमचं तोंड बंद होईल. असही एका युजरने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT