Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : मिलिंद नार्वेकरांची गच्छंती? 'हा' शिवसैनिक होणार ठाकरेंचा राईट हँड

काही दिवसांपूर्वी बंडकरून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील अनेकांनी ठाकरें भोवती एक चौकडी जमल्याचा आरोप केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Milind Narvekar News : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत अनेक बदल केले जात आहेत. राजकीय समीकरणांसोबत शिवसेना पक्षातील अंतर्गत अनेक गोष्टींमध्येही बदल केले आहे. या सर्वांमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ असणारी व्यक्ती म्हणून मिलिंद नार्वेकरांची ओळख असून, बंडखोरीनंतर नार्वेकरांवर मध्यस्थी करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता नार्वेकरांच्या जागी एका कट्टर शिवसैनिकावर मोठी जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे नार्वेकरांची गच्छंती होणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

त्यात नुकताच 21 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती रवी म्हात्रे अनेकदा पाहण्यास मिळाले होते. त्यामुळे ठाकरेंचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या नार्वेकरांची जागा आता रवी म्हात्रे घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, या बदलाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

म्हणून बदल केल्याची चर्चा?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंडकरून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील अनेक जणांनी ठाकरें भोवती एक चौकडी जमली असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. तसेच राणे, राज ठाकरे आदींनी देखील शिवसेना सोडतांना असेच आरोप केले होते. टीका होणाऱ्यांमध्ये मिलिंद नार्वेकरांचे नाव नेहमीच आघाडीवर होते. यामुळेच ठाकरेंनी नार्वेकरांऐवजी म्हात्रे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

मधल्या काळात म्हात्रे पक्षात सक्रीय नव्हते मात्र, बंडखोरीनंतर म्हात्रे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून, नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात म्हात्रे अनेकदा ठाकरेंच्या अवती भोवती फिरत असल्याचे दिसून आले. 1994 पासून मिलिंद नार्वेवर शिवसेनेशी जोडलेले असून, 2018 मध्ये त्यांची शिवसेनेचे सचिव म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता म्हात्रेंची उद्धव ठाकरेंशी वाढलेली जवळीक पाहता नार्वेकरांची जागा रवी म्हात्रे घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT