Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आमने-सामने; अजित पवार गटाने मागितली मुदतवाढ

शिवसेनेपाठोपाठ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट आमने-सामने आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

आमदार अपात्रता

मुंबई - पक्षशिस्त मोडल्याने अजित पवार गटाच्या आमदारांवर कारवाई करा. त्यांना अपात्र ठरवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार गटाकडून म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ मागण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करायची असल्याने आता यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. शिवसेनेबाबत त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय द्यायचा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीसाठी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया हिवाळी अधिवेशन काळातच सुरू केली जाणार आहे.

‘राष्ट्रवादी’ची सुनावणी संपवून ३१ जानेवारीपर्यंत अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. त्यातच अजित पवार गटाने म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. मुदतवाढ दिल्यास सुनावणीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने विधानसभेचे अध्यक्ष कोणता निर्णय घेतात याकडे ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आमदार अशोक पवार, नवाब मलिक यांना नोटीस बजावलेली नाही.

शिवसेनेपाठोपाठ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट आमने-सामने आले आहेत. परस्परविरोधी याचिकांतून दोन्ही गटांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या ५१ आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. यापैकी अजित पवार गटाने आपले म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

शरद पवार गटाकडून उत्तर

शरद पवार गटाच्या दहा आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आली होती. याला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. आम्ही कोणतीही शिस्त मोडलेली नाही, असे या उत्तराद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी तटकरे आज विदर्भात

नागपूर : ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हा संदेश घेऊन तसेच विदर्भातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारपासून (ता.५) विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर तटकरे प्रथमच विदर्भात येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT