Maharashtra Rain Alert esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यात आज 'या' जिल्ह्यात मुसळधार; पुढचे काही तास महत्त्वाचे

रोहित कणसे

राज्यात मागील जवळपास महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, आणि कोकण यासह राज्यातील अनेक भागात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. यादरम्यान येत्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे.

पुढील ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई ऑरेंज अलर्ट तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत ७, ८ आणि ९ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस तर १० सप्टेंबरला वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याने मुसळाधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत.

पुणे वेधशाळेने देखील राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगीतले आहे. ८ आणि ९ सप्टेंबर रोजी ढगांच्या गडगटांसह जोरदार पावसाची शक्यता अशी माहिती देण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर पुण्यात ढगाळ आकाश, तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ सप्टेंबर संध्याकाळनंतर पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT