Maharashtra Rain Updates  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार; नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Rain Update : राज्यात सात ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरूच असून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे काही पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि विदर्भात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळित झाले असून, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे पुरपस्थितीमुळे नागपूरमध्ये आज होणाऱ्या विद्यापिठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मॉन्सून सक्रिय असल्याने घाटमाथ्यावर पावसाची मुसळधार सुरूच आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातारा, रायगड, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला. तर विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे. यात दावडी, शिरगाव, ताम्हिणी येथे २५० मिलिमीटर, तर कोयना नवजा २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भात तिसऱ्या दिवशीही पावसाचे थैमान

तीन दिवसांपासून सर्वदूर विदर्भात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थितीत कायम असून, त्यात अधिकची भर पडली आहे. शेकडो गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. शेत-शिवारात पाणी साचल्याने लाखो हेक्टरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवसात विदर्भात तब्बल १९ जण पुरात वाहून गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना वगळता इतर सर्व धरणे ओवरफ्लो

सातारा जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम असून यामुळे जिल्ह्यातील कोयना वगळता इतर सर्व धरणे ओवरफ्लो झाली आहेत. तर कोयना धरणही संपूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे वाई तालूक्यातील बलकवडी धरण 100 टक्के भरले असून बलकडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT