weather update maharashtra  google
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : विदर्भात पावसाची ७ दिवसांपासून विश्रांती; जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती

रोहित कणसे

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने अनेक जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाण पुरेसा पाऊस न झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाची स्थिती काय असेल? चला जाणून घेऊया.

विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विदर्भात अतिवृष्टी झाल्याचे पाहयला मिळाले होते. अनेक गावे पाण्याखाली गेल्यानंतर आता मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता आहे. सध्या पिकाला पावसाची गरज असून फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पिक पावसावाचून वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावण्याची शक्यता आहे.

११ ऑगस्ट रोजी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण गेल्या १०-१२ दिवसात अल्प आहे. तसेच महाराष्ट्रात १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान विदर्भ व सलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तसेच २५ ते ३१ ऑगस्ट या काळात, विदर्भ, कोकण येथे पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरी इतका किंवा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुढील ७ दिवसांत मध्य (महाराष्ट्रसहीत), पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT