Maharashtra Rain Update 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update: पुणे, कोल्हापुरात मुसळधार, मुंबई जलमय...विदर्भात देखील पावसाचा इशारा

Sandip Kapde

Maharashtra Rain Update : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, कोकणपट्टा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजही हवामान खात्याने प्रमुख शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील १९ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्टमुळे या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. (latest rain update)

मुंबईत काल पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आज (शनिवार) सुद्धा राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत हलक्या स्वरुपात पाऊस पडेल

Maharashtra Rain Update

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघरचा समावेश आहे. पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नद्यांना पूर आला होता. अनेक गावे पाण्याखाली गेली होती.

पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, विजांच्या कडकटांसह पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT