Corona patients sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात ४४ हजारांहून अधिक रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंधही लागू केले आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राज्यात दररोज ओमिक्रॉनचे नवीन रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आज राज्यात दिवसभरात ४४ हजार ३८८ नवीन करोनाबाधित तर २०७ ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. शिवाय, राज्यात आज दिवसभरात १२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात १५ हजार ३५१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या, राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या २,०२,२५९ आहे. कोरोना महासाथ सुरु झाल्यापासून आजपर्यंत राज्यात १, ४१, ६३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या १ हजार २१६ झालेली आहे. या पैकी ४५४ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आजपर्यंत राज्यात ६५,७२,४३२ रूग्ण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. सध्या राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९४.९८ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.०४ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Diwali Bonus Laws: कायमस्वरूपीच नव्हे, प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो बोनस! जाणून घ्या नियम

Manoj Jarange Patil: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारं उद्घाटन तातडीने रद्द करा; जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन, भीमाशंकर वृक्षतोड परिसराची केली पाहाणी

SCROLL FOR NEXT