corona update corona update
महाराष्ट्र बातम्या

Corona Updates: राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट

कार्तिक पुजारी

मुंबई Corona Update- राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर 59 हजार 500 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 567 रुग्णांचा कोरोना विषाणूने जीव घेतला आहे. आतापर्यंत राज्यात 70 हजार 851 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 56 हजार 870 कोरोना रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra reports positive cases Corona Update discharges rajesh tope)

करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 47,71,022 झाली आहे. राज्यात मृतांचा आकडा वाढलेलाच असून आज 567 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मनपा 78 येथे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, ठाणे 56, सातारा 47, कोल्हापूर 31 येथे 25  मृत्यू नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे. आज नोंद झालेल्या 567 मृत्यूंपैकी 283 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 146 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 138 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,56,870 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,78,64,426 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47,71,022 (17.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,08,491 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,593 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दिवसभरात 59,500  रुग्ण कोरोनामुक्तआज 59,500 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 40,41,158 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.7 % एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT