students esakal
महाराष्ट्र बातम्या

सुट्टी संपली... आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरू

धनश्री ओतारी

राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली.

देशात कोरोनाचा प्रदुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं.

यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढलं आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू झाल्या आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत.

मोफत पाठ्यपुस्तके

पालिकेच्या पहिली ते आठवी या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात; तर पालिकेच्या माध्यमिक शाळांना पालिकेच्या वतीने मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. यंदा सुमारे तीन लाख पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला बनवा घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल वडापाव, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2025

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

SCROLL FOR NEXT