Corona Update : राज्यात कोरोना रुग्ण घटले; मृत्यूही नियंत्रणात  sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात कोरोना रुग्ण घटले; मृत्यूही नियंत्रणात

राज्यात कोविड रुग्णसंख्या तसेच रुग्ण दगावण्याचे प्रमाण नियंत्रणात असून आज 686 नवे रुग्ण सापडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोविड रुग्णसंख्या तसेच रुग्ण दगावण्याचे प्रमाण नियंत्रणात असून आज 686 नवे रुग्ण सापडले. मृतांची संख्या ही कमी झाली असुन आज 19 रुग्ण दगावले. रविवारी 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. आज 912 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,68,791 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.64 % एवढे झाले आहे.

आज मृतांचा आकडा ही कमी झाला असून आज 19 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1,40,602 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 11,943 इतकी आहे.आज 686 रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,24,986 झाली आहे.

औरंगाबाद, अकोला, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15,नाशिक 1,पुणे 1, कोल्हापूर 1, लातूर 1, मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 99,859 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT