ST Bus News esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus: ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका! एसटी महामंडळाकडून सर्व बसच्या तिकीट दरात वाढ

दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला. मंगळवारपासून (ता. ७) ही दरवाढ लागू होणार असून, २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीने जाण्यासाठी ५० ते १०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी करण्यात आली आहे. दरवाढीतून अश्वमेध व शिवनेरीला वगळण्यात आले असून, या बसला पूर्वीचेच दर राहणार आहेत.

खासगी बसने वाढवले भाडे

खासगी बसच्या भाड्यातही तब्बल दीडपट वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी साजरी होणार आहे; तर प्रवाशांचे दिवाळे निघणार आहे. खासगी बसच्या तुलनेत एसटी बसची तिकीट दरवाढ कमी आहे. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास याही एसटीच्या सुविधा आहेत.

अशी झाली दरवाढ

ठिकाण -जुने दर- नवे दर

पुणे- ५०५- ५५५

मुंबई -७८५ -८६५

नागपूर- १०१० -११११

नाशिक -४४५ -४८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT