Vocational Courses esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget : 'पदवीपर्यंत मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत मिळणार; तब्बल 2 लाख 5 हजार मुलींना घेता येणार लाभ'

अर्थसंकल्पात (Budget) मुलींना उच्च शिक्षण मोफत (Higher Education Free) उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.

संजीव भागवत

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही महिन्यापूर्वीच राज्यातील सर्व मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.

मुंबई : राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी पदवी-पदविकाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे (Vocational Courses) शिक्षण घेणाऱ्या मागास, इतर मागास, आर्थिक दुर्बल आदी घटकातील मुलींचे १०० टक्के शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाणार आहे. यासाठीचा लाभ २ लाख ५ हजार मुलींना होणार असून यासाठी सरकारकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांसाठी २ हजार कोटी रूपयांचा शैक्षणिक प्रतिपुर्तीचा भार सरकारकडून उचलला जाणार आहे.

अर्थसंकल्पात (Budget) मुलींना उच्च शिक्षण मोफत (Higher Education Free) उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रूपयांपर्यंत असेल, अशाच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही महिन्यापूर्वीच राज्यातील सर्व मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने 'सकाळ'ने हा विषय लावून धरला होता. २३ जून रोजी 'मुलींच्या मोफत शिक्षणाचा खो' या मथळ्याखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. मात्र, आज जाहीर करण्यात आलेली ही घोषणा अर्धवटच असून ती अपूर्ण असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रात उमटल्या आहेत. पदवीपर्यंतच्या शिक्षणात पारंपरिक शिक्षणचाही समावेश असेल, तरच सर्व मुलींना न्याय मिळू शकेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारने जाहीर केलेल्या योजनेत केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणाचा उल्लेख असून कला, विज्ञान, वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्रमाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकारची ही नवी योजना घोषणेनंतर वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे बारावीपर्यंत मुलींचे शिक्षण मोफत असले तरी त्याची नीट अंमबजावणी होत नाही. असंख्य अभ्यासक्रमांना मुलींना शुल्क भरल्याशिवाय शिक्षण पूर्ण करता येत नाही, अशा‍ स्थितीत ही पदवीपर्यंच्या मोफत शिक्षणाची योजना यशस्वी होईल काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचे द्वार उघडे करून राज्य शासनाने त्यांच्या पंखांना स्वप्नपुर्तीचे बळ दिले आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार असल्याच्या घोषणेने लेकींच्या हितासाठी राज्य शासनाची वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

-चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT